Monday, October 6, 2008

आजचा दिवस ...आजचे जीवन

आजचा दिवस ...आजचे जीवन
काल पासून न्यूज़ वर धुळे दंगलीच्या बातम्या ऐकत होतो ... आज सकाळी पण पेपर उघडला तर तीच न्यूज़ वाचली ....
"रविवारी धुळे शहरात बॅनर फाडल्याच्या कारणावरून हिंदू-मुस्लिम वणवा पेटला।" वाचून थोड़ा त्रास झाला पण करणार काय ... हल्ली हिंसाचार हां काय रोजचाच झाला कधी बोंम्बस्फोट तर कधी दंगल सगळे कसे अगदी कायमचेच ॥
गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढतच आहे त्यामुळे चौकट राजा च्या गाण्यातील जीवन सुंदर होते पण आता ते खरच सुंदर आहे का ? असा प्रश्न पडला आहे ..असो कितीही बोलले तरी हां विषय संपणार नाही ...
दुसरे असे की आज मी माझे ब्लॉगर.कॉम वर अकाउंट ओपन केले व आज मी माझा पहिला वहिला ब्लॉग लिहित आहे
अधून मधून लिहत जाइन असेच मनात आले की ..भेटू लवकरच नविन ब्लॉग सह
सुंदर जीवनाची आशा करुया
मनोज माळी.
http://manojhmali.blogspot.com/

No comments: