Thursday, December 9, 2010

प्रेमाचा परीसस्पर्श

प्रेमाचा परीसस्पर्श झाला की सारं आयुष्यच बदलून जातं
प्रेमाच्या दिव्यशक्तिचा साक्षात्कार फक्त त्याच भाग्यवंताना होऊ शकतो
ज्यांनी आयुष्यात एकदा तरी कुणावर मनापासून प्रेम केलेलं असतं
मग त्या उत्कट अनुभुतिने स्थळ कालाचे संदर्भच आपल्या पुरते पार बदलून जातात
तेच ते रुक्ष , व्यवहारी जग चैतन्यमय ,तरल भासु लागतं , जणू काही स्वप्नचं ..!!

No comments: